भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष विदुला अधटराव याच्यावर बेकायदा सावकारीचा आरोप करीत पंढरपुर शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी कारवाई केली होती.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या बरोबरच सह.निबंधक सहकारी संस्था पंढऱपुर यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीही सहभागी झाले होते.या कारवाईत विदुल अधटराव याच्या घरातून पोलिसांनी काही चेक व हिशोबाच्या वह्या जप्त केल्या होत्या.मात्र प्रत्यक्ष गुन्हा नोंद करताना रुपये ३० हजार इतकी किरकोळ रक्कम दाखविण्यात आली व ५ लाख रुपये रक्कम त्रयस्थ इसमाने नेली असा आरोप विदुल अधटराव याने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रारीच्या माध्यमातून केला आहे.
मात्र विदुल अधटराव याच्या विरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे व पोलीस उपनिरीक्षक भागवत यांनी केलेल्या कारवाईत बेकायदा सावकारीच्या बाबत अनेक पुरावे हाती लागले होते,चेक हिशोबाच्या वह्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या.या प्रकरणी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या नवले नामक इसमाने पुढे विष प्राशन करून आत्महत्या केली होती.व या प्रकरणी भादंवि कलम ३०६ नुसार विदुल अधटराव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.व त्यास अटक करण्यात आली होती.सध्या तो जमिनीवर मुक्त असून पुढील काही प्रकणात कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्नशील असून हे प्रकरण घडल्यानंतर जमिनीवर मुक्त झाल्यानंतर चार महिने विदुल अधटराव हा गप्प होता,मात्र आता पंढरपुर शहर पोलीस ठाण्याकडून आणखी काही कारवाई होऊ नये यासाठी दबाव आणण्याच्या हेतूनेच त्याने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली आहे अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.