ताज्याघडामोडी

महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण

नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कृतिसमितीने एकत्रित येत कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाला व इतर दोघांना अटक करण्याची मागणी करुन महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

शहादा शहरातील गरीब नवाज काॅलनीतील भारत डेअरी यांचे चार महिन्याचे कमर्शियल वीज बिल वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे कर्मचारी गेले असता विज बिल भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेर डेअरीचे वीज कनेक्शन कट केले. त्याचा राग आल्यामुळे मी वीज बिल भरण्यास तयार आहे व डेअरी वर येऊन त्वरित वीज कनेक्शन जोडणी करा अन्यथा डेअरीतील पदार्थ खराब होतील, असे सांगून कर्मचाऱ्यांना बोलवून नगरसेवक वाहिद रशिद पिंजारी, मन्नान रशिद पिंजारी आणि वसीम अख्तर शेख तेली यांनी वीज वितरण कंपनीच्या गणेश साळी व सुनिल ठाकरे या कर्मचार्यांना बेदम मारहाण केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago