गुन्हे विश्व

पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; हत्येसाठी प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारी

नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेनिमित्त पतीला वाचवणाऱ्या सावित्रीच्या कथेला उजाळा मिळाला. समाजातल्या अनेक सावित्रींच्या कथा वृत्तपत्रं, सोशल मीडियावर झळकल्या. त्याचवेळी झारखंडमधल्या एका ‘सावित्री’नं नोकरीच्या लालसेपोटी नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली. या पत्नीनं आपल्या प्रियकरालाच आपल्या पतीला ठार मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती.

रामगड जिल्ह्यातल्या बडकाकाना रेल्वे पोलिसांनी ही खुनाची घटना उघडकीस आणली

मृत रवींद्र सिंह हा रेल्वेचा कर्मचारी होता. त्याची पत्नी मीरा देवी हिचे दोन वर्षांपासून संदीप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. रवींद्र सिंह याला त्याची खबर लागताच मीरा देवी हिनं पतीला आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या प्रियकरासमवेत पतीच्या हत्येचा कट रचला.

पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला पतीच्या जागेत रेल्वेत सरकारी नोकरी मिळेल आणि आपण प्रियकरासोबत मजेत आयुष्य घालवू अशी तिची योजना होती. पण पोलिसांनी रवींद्र सिंह यांच्या मृत्यूची कसून चौकशी केली आणि मीरादेवी आणि तिच्या प्रियकराचं कट कारस्थान उघडकीस आलं.

370 महिला, 7 मोबाईल आणि…; Video Call करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

याबाबत अधिक माहिती देताना बडकाकाना पोलीस ठाण्याचे प्रभारी मंगलदेव ओराओं म्हणाले, की मीरा देवीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आपला पती रवींद्र सिंह याची हत्या केली. त्यासाठी तिनं प्रियकर संदीप यालाच 3 लाखांची सुपारी दिली होती आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून 1500 रुपये दिले होते. पतीची नोकरी मिळवून प्रियकराबरोबर मजेत राहण्याच्या उद्देशानं पत्नीनंच ही हत्या घडवून आणली असून, यामध्ये मीरा देवीचा प्रियकर संदीप याचा मित्र रोशन याचाही सहभाग होता. या सर्वांना पकडण्यात आलं आहे.

अशी केली हत्या :

संदीपचा मित्र रोशन यानं रवींद्र सिंह यांना पार्टी करण्यासाठी बोलावलं. त्यावेळी संदीपही तिथं होता. तिघांनी भरपूर मद्यपान केलं. त्यानंतर तिघंही मोटरसायकलवरून रेल्वे मैदानावर फेऱ्या मारत होते. नंतर ते डिझेल शेडजवळच्या निर्जन, कच्च्या रस्त्याकडे गेले. तिथं तिघंही लघुशंकेसाठी थांबले. त्यानंतर जेव्हा रवींद्र सिंह मोटरसायकलवर बसायला गेले, तेव्हा संदीपनं त्याचा गळा वायरनं आवळला आणि त्याला ठार केलं. नंतर दगडानं त्याचा चेहरा ठेचला आणि मृतदेह (Body) झुडपात फेकून दोघे निघून गेले.

असं झालं सत्य उघड :

रवींद्र सिंहचा मृतदेह मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. तेव्हा त्याचे कॉल डिटेल्स तपासताना पोलिसांना रोशनचं नाव कळलं. त्यावरून तंत्रज्ञान विभागाच्या मदतीनं पोलिसांनी रोशनचा ठावठिकाणा शोधला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं सगळं खरं सांगून टाकलं आणि या खुनाचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी रवींद्र सिंहच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago