ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं, त्यामुळे ओबीसींच्या विविध 56 हजार जागा संकटात आल्या आहेत. मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे चलावं इम्पेरीकल डेटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले.आज भाजपचं ओबीसींसाठी आंदोलन आहे त्याचं मी स्वागत करतो. दोन चार शिव्या आम्हाला द्या पण तुम्ही ओबीसीवर बोला, असंही भुजबळ म्हणाले. पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. ओबीसींमध्ये कुठल्या जातीचा उमेदवार उभा राहिला तर इतर जाती समर्थन करत नाही ही परिस्थिती आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडची परिस्थिती वेगळी आहे, असं भुजबळ म्हणाले.
इंपेरिकल डाटा हा कुणाच्या घरची संपत्ती नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय संपूर्ण देशासाठी लागू आहे. मी फडणवीस यांना फोन केला, देवेंद्रजी हे सर्व देशाला लागू आहे, तुम्ही केंद्राकडे जा आणि इंपेरिकल डेटा आणा. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं, असं भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ घाबरत नाही, खूप हातोडे झेलले आहे, लढायला तयार आहे. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं. मित्रांच्या कृपेने मी अडीच वर्षे आत गेलो होतो, असंही छगन भुजबळ म्हणाले.
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…