पिंपरी- एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन त्याखाली भाईगिरीचे भलेमोठे कॅप्शन देऊन पोस्ट व्हायरल केली होती. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोस्टद्वारे त्याने गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले. त्याच्यावर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली आहे. गुंडाविरोधी पथकातील पोलिस शिपाई रामदास कुंडलिक मोहिते यांनी निगडी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर विभाग आणि गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अशा कुरापती करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. आरोपी गायकवाड याचा हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला असता पोलिसांनी त्याला अंकुश चौक निगडी येथून कोयत्यासह ताब्यात घेतले.
आरोपी गायकवाड याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड हा रावण साम्राज्य टोळीशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. तो रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे करत असताना त्याला सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच महागात पडले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर चक्क हात जोडले. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…