गुन्हे विश्व

उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले, ७ जणांना अटक

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत वायएक्सेस स्ट्रक्चरल स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक अशोक संवरलाल जिंदाल यांनी खासदार उदयनराजे यांच्याविषयी अपशब्‍द वापरल्‍याच्या कारणास्‍तव शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्‍यांच्या तोंडाला काळे फासले. गुरुवारी (दि.२४) ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अशोक जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासून त्‍यांना इंदापूर पोलिस ठाण्यात हजर केले. खासदार उदयनराजे यांच्या विषयी अपशब्‍द वापरणाऱ्या जिंदाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, जिंदाल यांनी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्‍यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणातील सात जणांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरी लोणी देवकर येथील एमआयडीसीच्या चौकात भगवे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी दोन आलिशान गाडीतून उतरून जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासले. हे कार्यकर्ते शिवधर्म फाऊंडेशनचे असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, जिंदाल यांना संतप्त कार्यकर्त्यांनी मारहाण केल्‍याचे या व्हिडिओतून दिसत असून, त्यात जिंदाल यांच्यावर काळी शाई फेकून तोंडाला काळे फासल्‍याचे दिसून येत आहे.पोलिस ठाण्यात जिदांल यांना घेवून आल्‍यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवल्‍याचा आरोप केला. या उद्योजकाने बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.बेकायदेशीर जमाव जमवला तसेच कोरोना महामारीत तोंडाला मास्‍क लावले नाही. कोरोना काळातील जिल्‍हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्‍याच्या कारणातून शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अशोक जिंदाल यांना केलेल्या मारहाण प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे (वय 28, रा. सरस्वत नगर, इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे) अमोल अंकुश पवार (वय 25, रा. गांधी चौक, नवीन बाजारतळ, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर), कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33 वर्ष, रा. विजय चौक अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय 24 वर्ष, रा. राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), किरण रवींद्र साळुंखे (वय 27 वर्षे, रा. भाग्यनगर, भवानीनगर, ता इंदापूर, जि. पुणे), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25 वर्ष, श्रीराम नगर, भिगवण रोड, बारामती, ता. बारामती, जि पुणे), सुनील विठ्ठल रायकर (वय 23 वर्ष, राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि. सोलापूर), 4 ते 5 अनोळखी इसमांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago