नवी दिल्ली – बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.
दर महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतरही काही सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. जुलै 2021 मध्ये सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्यात आहेत. तर या व्यतिरिक्त 6 सुट्ट्या या साप्ताहिक सुट्ट्या म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या आहेत. अशाप्रकारे एकूण 15 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत. बँका कधी नेमक्या बंद असणार हे जाणून घेऊया…
जुलैमध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद
– 4 जुलै 2021 – रविवार- 10 जुलै 2021 – दुसरा शनिवार
– 11 जुलै 2021 – रविवार
– 12 जुलै 2021 – सोमवार – कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ)
– 13 जुलै 2021 – मंगळवार – भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि कश्मीर, भानू जयंती-सिक्किम)
– 14 जुलै 2021 – द्रुकपा त्शेची (गंगटोक)
– 16 जुलै 2021- गुरुवार – हरेला पूजा (देहरादून)
– 17 जुलै 2021 – खारची पूजा (आगरतळा, शिलाँग)
– 18 जुलै 2021 – रविवार
– 19 जुलै 2021 – गुरु रिम्पोछे के थुंगकर त्शेचु (गंगटोक)
– 20 जुलै 2021 – मंगळवार – ईद अल अधा (देशभर सुट्टी)
– 21 जुलै 2021 – बुधवार – बकरी ईद (देशभर सुट्टी)
– 24 जुलै 2021 – चौथा शनिवार
– 25 जुलै 2021 – रविवार
– 31 जुलै 2021- शनिवार – केर पूजा (आगरतळा)
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…