पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्रोत्तर काळात खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले ते निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांनी.१९५० ते १९८० च्या दशकांपर्यत राज्यात जात,धर्म निरपेक्ष भावनेने सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या समाजसेवकांचा मोठा बोलबाला होता.राजकीय पदे,राजकीय प्रतिष्ठा अथवा पैशाचा मोह न धरता अनेक समाजसेवकांनी केलेल्या कार्यामुळे सामाजिक कार्यकर्ता या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.मात्र पुढे यात बोगस समाजसेवकांचा शिरकाव होऊ लागला आणि हळूहळू समाजसेवक अथवा समाजसेवी संघटनाचा पदाधिकारी हा खरेच समाजसेवेचे काम करतो कि यातून त्याला स्वहित साधायचे आहे याचा अंदाजही सामान्य जनता घेऊ लागल्याचे दिसून आले.मात्र तरीही राज्यात अशा बोगस समाजसेवकांचा मोठा सुळसुळाट झाला असून कुठल्या तरी संघटनेच्या नावाखाली लेटरपॅड वर शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात सतत तक्रारी करणे यातून दबाव निर्माण करत आर्थिक फायदा करून घेण्याचे प्रकारही राज्यात अनेक ठिकाणी उघडकीस येत आहेत,चर्चिले जात आहेत.मात्र अशा प्रवृत्तीमुळे निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दीसून येत आहे.समाजसेवक म्हणून मिरवत असताना काही तथाकथित समाजसेवक केवळ विविध शासकीय कार्यालयात तक्रारी देणे एवढाच उद्योग करताना दिसून येतात.अशा प्रवृत्तीकडून नेमके शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात एखाद दिवसाचे आंदोलन करणे,बातम्या लावून घेणे आणि बातमी आली कि पुढे या बातमीची कात्रणे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून दबाव निर्माण करणे एवढाच उद्योग केला जात असल्याचे दिसून येते.मात्र त्यांनी केलेल्या आंदोलनांचे,उपोषणाचे फलित काय याची माहिती देण्यास मात्र पद्धतशीर टाळाटाळ केली जाते.मात्र कधी कधी एखादा अधिकारी खमक्या भेटला कि अशा तथाकथित समाजसेवकांची पोलखोल झाल्याशिवाय रहात नाही.असंच प्रकार अहमद नगर जिल्ह्यात घडला असून अवैध वाळू उपशाबाबाबत सातत्याने तक्रारी करून थेट तहसीलदारांनाच खंडणी मागणाऱ्या समाजसेवका विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर तालुक्यातील पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीं नुसार अन्याय निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष हा तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत व तहसील कार्यालयातील कामकाजाचा बाबत सातत्याने तक्रारी करत होता व त्या बाबतच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या तहसीलदाराच्या व्हाट्स अप वर टाकून अपरोक्षपणे पैशाची मागणी करत होता.या विरोधात तहसीलदार वैशाली देवरे यांनी पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली होती.सोमवारी अरुण रोडे हा पैसे नेण्यासाठी तहसील कार्यालयात आला असता पोलिसांनी त्यास रोख रकमेसह रंगेहाथ पकडले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…