जमिनीवर सुटलेल्या खाजगी सावकाराने कर्जदारास पेट्रोल टाकून जिवंत जाळले

राज्यात बेकायदा व जुलमी सावकाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सावकारीतून मिळालेल्या श्रीमंतीतून राजकीय व सामाजिक वर्तुळात सडकछाप तरुणांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा करत आपल्या परिसरातील मोठ्या नेतेमंडळीचा वरदहस्त प्राप्त करून घेण्यातही अनेकजण यशस्वी झाले आहेत.सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालाच तर लगेच जमीन मिळतो अशी भावना या अवैध सावकारांमध्ये वाढीस लागली असून जमिनीवर सुटका होताच किंग इज बॅक च्या पोस्टमुळे असे जुलमी व बेकायदा सावकार पुन्हा जनमानसात मान उंचावून वावरताना दिसून येतात.राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्रे स्व.आर.आर.पाटील यांच्या हाती असताना त्यांनी खाजगी सावकरांना कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढा असे उघड आदेश पोलीस प्रशासनास दिले होते.मात्र आता राज्यात पुन्हा खाजगी जुलमी सावकारी आपला बीभत्स चेहरा दाखवीत असून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे खून प्रकरणात जमिनीवर सुटलेल्या सावकाराने एका तरुणास १३ दिवस डांबून ठेवल्यानंतर त्याचा पेट्रोल टाकून जाळून खून केला आहे.शिवराम कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मयताचे नाव असून त्यास सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र ९० भाजल्यामूळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
              या प्रकरणी नवनाथ हणुमंत राऊत (वय३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) व सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे जुलमी खाजगी सावकारी बाबत पुन्हा संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago