गत अधिवेशनात आपल्या अभ्यासू शैलीत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठुन सळो की पळो सोडणाऱ्या, सचिन वाझे प्रकरण हातात घेवुन १०० कोटींची वसुलीपर्यंतच्या मुळापर्यंत जावुन सतापयंत्रणेला हादरवुन सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत करमाळ्यातील आमदार संजय शिंदे यांचा कारनामा पोहचला असुन शेतकऱ्यांच्या परस्पर २२ कोटी ११ लाख कर्ज उचलणाऱ्या ‘मामा’ला आपण आता ‘कामा’ला लावु, या संदर्भात उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तारांकित उपस्थित करणार असा शब्द विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीचे नेते अतुल खुपसे पाटील यांना दिला आहे.
याचे झाले असे की, करमाळा-माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर पुणे येथील पंजाब नॅशनल बँक, कोथरूड येथुन आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशनने शेतकऱ्यांच्या परस्पर घेतलेल्या २२ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज २०१३ मध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे तुम्हाला खत देतो म्हणून शेतकऱ्यांचे ७/१२, आधारकार्ड अशी कागदपत्रे गोळा करुन त्याचा गैरवापर करत हे कर्ज काढले असुन २०१७ मध्ये ही कर्जाची खाती नवी-जुणी केली आहेत.
मात्र गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना पंजाब नॅशनल बॅंकेकडुन अचानक नोटीस आल्याने शेतकरी धास्तावले. पुणे नक्की कुठे आहे..? पंजाब नॅशनल बॅंक कसली असतेय..? हे कधीही माहित नसलेल्या शेतकऱ्यांनी तर डायरेक्ट अंथरुण धरले. पण अशा १५०० शेतकऱ्यांना शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांनी आधार दिला. शेतकऱ्यांना ५-२५ हजार कर्ज घ्यावयाचे झाल्यास किलोभर कागदं अन् ५० हेलपाटं मारावयास लावणाऱ्या बॅंकेने केवळ झेरॉक्स कागदांच्या आधारे कर्ज दिलेच कसे..? असा सवाल करुन पंजाब नॅशनल बॅंकेच्या दारात अर्धनग्न होत भिकमांगो आंदोलन केले. शिवाय एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट मुंबई गाठत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन याबाबत निवेदन देवुन सविस्तर चर्चा केली.
दरम्यान या कर्जप्रकरणात पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी व विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आमदार संजय शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शेतकर्यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ईतर बॅंका त्यांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पावले उचलावीत असेही अतुल खुपसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवाय माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन खुपसे पाटील यांनी या संदर्भात घेतली असुन याबाबत देखील चर्चा केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…