ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी
पंढरपूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे हे नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य अडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, मी आपल्या पक्षाचा एक कार्यकर्ता असून गेली अनेक वर्षे आपण द्याल ती जबाबदारी पार पाडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आपण ही माझेवर विश्वास ठेवून मला वेळोवेळी पक्ष कार्य करण्याची संधी दिली आहे. त्यातूनच आपण मला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव पद दिले आहे आणि त्यातून मी पूर्णवेळ पक्षकार्य करीत आहे.
श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पडत्या काळात पक्षामध्ये बोटांवर मोजण्या इतके लोक शिल्लक असताना शरदोउत्सवसारखा मोठा कार्यक्रम सुरू ठेवला. साहेबांच्या आईच्या नावे जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना शरदाई पुरस्कार देण्यात येतात, अनेक आंदोलन करून त्यांनी भाजपाच्या काळात पक्षाला उभारी देण्याचे काम करीत राहिले आणि महादेव कोळी समाजाचे एकमेव पदाधिकारी आहेत की जे पक्ष स्थापने पासून सक्रिय पणे काम करत आलेत. मग त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा, गोरगरीब मुलींना सायकल वाटप,वही वाटप, गौरी सजावट स्पर्धा आदि उपक्रम राबवत आहेत.
सध्या वरिष्ठ पातळी वरून सर्वच बाबतीतून श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे,पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या नावाची शिफारस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्याकडे केली आहे,व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारणी मधून प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी ही त्यांच्या निवडीसाठी आग्रह धरला आहे.
तसेच मंदिर समितीवर महादेव कोळी समाजासाठी एक जागा देण्यात येते. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचा मी एकमेव पदाधिकारी महादेव कोळी समाजाचा आहे. आपण दिलेल्या संधीचा पक्षवाढीसाठी सर्व पध्दतीने, ताकदीने काम करेल व उलट पक्ष वाढीसाठी इमानेइतबारे काम करत आलो अन भविष्यात ही जोमाने करेल एवढा विश्वास देतो.
सध्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्यपदी नियुक्त मिळालेस मला पक्ष कार्य करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल. तरी मला सदस्यपदी नियुक्ती करावे अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. जर राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव कोळी समाजासाठी जागा दिली तर श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चितच मानले जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago