ताज्याघडामोडी

अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी २ लाख ३३ हजार लाचेची मागणी

सांगली : जत तालुक्यातील परागंदा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हेत्रेला अटक केली. म्हेत्रेच्या सांगण्यावरुन लाच घेताना दोन दिवसांपूर्वी माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने कारवाई केली होती. यामध्ये माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.मात्र संख येथील अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे त्यावेळी पसार झाले होते.

सापळा रचून म्हेत्रेला अटक

तासगाव मणेराजुरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घराची झाडाझडती केली. यावेळी सापळा रचून म्हेत्रेला अटक करण्यात आली. कोर्टाने त्याची 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार शेतात माती वाहतूक करत असताना वीस दिवसांपूर्वी अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे यांनी वाहनावर कारवाईच्या अनुषंगाने संख अप्पर तहसिलदार कार्यालयात वाहने लावली होती. या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी आणि वाहने सोडण्यासाठी दोघांनीही तक्रारदारकडे दोन लाख 50 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने 5 जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago