पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे आणण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार दि. 23 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे.
तालुक्यातील मौजे आंबे व मौजे पोहोरगाव दरम्यानच्या भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. याची माहिती मिळताच तहसीलदार सुशील बेल्हेकर हे स्वतः कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पोहोरगाव येथे गेले होते. तेथे पाहणी केली असता वाळू उपसा करणारी लोक नदीपार करून आंबे हद्दीत गेले. तहसीलदार व कर्मचारी यांनी स्पीड बोट चा वापर करत नदीच्या पलीकडे आंबे या ठिकाणी पोहोचले. तेथे बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. अधिक पाहणी केली असता नदीपात्राबाहेर काठाला 1 लाख रुपये किंमतीचा 20 ब्रास वाळु चा साठा केलेला आढळून आला. तर वाळू उपसा करणार्या सहा बोटी नष्ट करण्यात आल्या तसेच वीस ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला सदर शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे पाठवण्यात आला.
या कारवाईत तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी संतोष सुरवसे, गणेश टीके, समीर मुजावर, रणजीत मोरे यांच्यासह तलाठी आणि कोतवाल सहभागी झाले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…