पती-पत्नीतील वाद विकापाला गेले की नको त्या घटना घडतात. जळगावमध्ये देखील पती-पत्नी वाद झाले आणि या वादात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पती सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप वार करत खून केला.या घटनेत पूजाचा भाऊ शंकर भिका चव्हाण (वय १८) जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पती सुनील पवार हा सतत पत्नी पूजा हिच्यावर संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती.पूजाचं माहेर पाळधी येथील मारवाडी गल्लीत होतं. तर सासर गेंदालाल मिल येथे होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी होती.
दरम्यान मंगळवारी देखील पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते. त्याची पाळधी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानंतर हा खून करण्यासाठी सुनील याने बाजारातून चाकू घेतला. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच त्याने तिच्यावर वार केले. या घटनेमुळे पाळधीत खळबळ उडाली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…