गुन्हे विश्व

रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ

पुणे – घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

रज्जाक महंमद मणेरी, वय २४ मूळगाव बावडा, ता. इंदापूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव असून ते राजगड पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. याबाबत रज्जाक यांचे वडील व निवृत्त पोलिस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार रात्रीपासून रज्जाक फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता.

त्यामुळे त्यांनी खिडकीतून काठीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहीले होते.

दरम्यान, ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राजगड पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago