शिक्षकांना देण्यात येणारी इलेक्शन ड्युटी आणि कोरोना ड्युटी हि सातत्याने विविध कारणामुळे वादात सापडली असल्याचे दिसून आले आहे.शारीरिक आजार अथवा इतर कारणामुळे अनेक शिक्षकांचा इलेक्शन ड्युटी घेण्यास विरोध असल्याचे दिसून आले तसाच प्रकार गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांना कोरोना उपायोजना बाबत विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.अशातूनच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.असाच प्रकार सोलापुरात घडला असून शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली, असा प्रश्न विचारत मुख्याध्यापकांना मारहाण करण्यात आली आहे .
सोलापूरमधील सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. आरोपीविरोधात मारहाण प्रकरणी सद्दाम जाकीर नाईकवाडी याच्याविरोधात सोलापूरच्या जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला कोव्हीडचा सर्वे करण्याचे काम दिल्याबद्दल नाईकवाडीचा मुख्याध्यापक शेख यांच्यावर राग होता.यातूनच नाईकवाडी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…