राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी बापु शिंदे यांची निवड

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश राजुबापू पाटील यांनी नुकतेच शिवदास (बापु) शिंदे यांना निवडीचे पत्र दिले.

राष्ट्रवादी युवकचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे हे सन 2007 पासुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या युवकांची मजबुत फळी निर्माण करुन त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार सक्रीयपणे केलेला आहे. त्यांच्या आजतागायत केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली असुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन सर्वसामान्य युवकांच्या विकासात ते भरीव कार्य करतील व पक्ष संघटना मजबुतीने उभे करतील. असा विश्‍वास राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

     वरिष्ठांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठापुर्वक आणि सक्रीयपणे, प्रामाणिकपणे पार पाडीन. असे मत यावेळी राष्ट्रवादी युवकचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गणेशदादा पाटील,  जि.प. सदस्य अतुल खरात, प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस अरुण आसबे, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश पाटील, मंगेश जाधव, अ‍ॅड. शाम पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिध्दीप्रमुख विजय काळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago