ताज्याघडामोडी

पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार

पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वारकरी संप्रदायात संभ्रम वाढला आहे.

राज्यातील सरकार दारू दुकाने सुरु करताना बैठक घेत नाही, बार सुरु करताना बैठक घेत नाही. र बहुजन समाजाची शेकडो वर्षाच्या वारी परंपरेसाठी सारख्या बैठक घेते आणि शेवटी परवानगी नाकारते अशा शब्दात राज्यातील ठाकरे सरकारला निशाणा करीत वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते.

हे सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात, काम मात्र औरंगजेबाचे करतात, असा टोला लगावला.

कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी वारकरी तयार असतानासुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे? असा सवाल करत काही वारकरी 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात करणार आहे. आपणही एक दिवस यात सामील होणार असल्याचे सांगताना आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी यात सहभागी होणार असा संदेश सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

56 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago