गुन्हे विश्व

अखेर सोलापूर जिल्ह्यातील ‘त्या’ शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

शिक्षणाचा श्री गणेशा करताना गुरुब्रम्हा गुरुविष्णु म्हणून केली जाते.माता पित्याच्या बरोबरीने गुरुचे स्थान मानले जाते पण केवळ नोकरी करून बक्कळ पैसे मिळवायचे,कुठल्या तरी साखळी गुंतवणूक योजनेचे एजंट व्हायचे असले उद्योग करण्याबरोबरच बीभत्स वर्तन करणाऱ्या काही प्रवृत्तीही या पेशात शिरल्या असल्याचे राज्यात वेळोवेळी घडलेल्या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अशा घटनांचे वृत्त कानावर पडताच संतप्त प्रतिकिया व्यक्त होताना दिसून येतात.अशाच प्रतिक्रिया सध्या कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे उमटू लागल्या असून लस घेण्यासाठी शाळॆत आलेल्या माजी विद्यार्थीनीशी अश्लील वर्तन केलेल्या मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बसवनगर येथील असलेल्या विनोदकुमार चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील बसवनगर येथील विनोदकुमार चव्हाण हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पाटणे येथील शाळेत कार्यरत होता.२५ मे रोजी शाळेत सदर पीडित माजी विद्यार्थिनी आई वडील समवेत लसीकरणावेळी आली असता सदर शिक्षकाने तिच्याशी अश्लील वर्तन केले.या बाबत आई वडील सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ करत होते.मात्र बालविकास समितीने या बाबत पाठपुरावा केल्याने अखेर शाहूवाडी पोलीस ठाण्यात सदर शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago