बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तसा 30मिनिटे बैठक झाली ही बैठक संपल्यानंतर गाड्याचा ताफा अडवला.
शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना, या कंत्राटी कर्मचाऱ्याना अजित पवार आणि राजेश टोपे यांना भेटू दिले नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघताच त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, मात्र या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाढयाचा ताफा पुढे निघाला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांना या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे.
पवारांच्या दौऱ्यात युवकाने केली घोषणाबाजी
बीड जिल्ह्याच्या आढावा बैठक सुरु असताना, बाहेर एका युवकाने जोरजोरात घोषणा दिल्या. दरम्यान, घोषणा दिलेल्या युवकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अजित पवार बीड जिल्ह्याच्या खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेत असताना सदर प्रकार घडल्याने काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…