ताज्याघडामोडी

भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे.

डीएनएवर आधारित कोरोना लस

झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे.

आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणारी झायडस कॅडिला ही दुसरी कंपनी आहे. तर, डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील पहिली लस आहे. या लसीमध्ये विषाणच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करुन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

28 हजार स्वयंसेवकांची नोंदणी

निती आयोगाचे सदस्य वी.के.पॉल यांनी झायडस कॅडिलाकडे कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी तीन टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकांनी चाचणीसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली. झायडस कॅडिला लवकरच त्यांनी कोरोना लसीच्या चाचणीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आमच्याकडे सादर करेल, असं वी.के.पॉल म्हणाले. आम्हाला झायकोव-डी पासून अधिक अपेक्षा आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.

भारतात आतापर्यंत तीन लसींना मंजुरी

भारत सरकारनं आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाच्या स्पुतनिक वी लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago