बीड, 17 जून : मुजोर संस्था चालकाकडून शिक्षकाच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत उघडकीस आला आहे. सतीश बळीराम जाधव अस पीडित शिक्षकांचे नाव आहे. यात शिक्षक आणि संस्था चालक यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यात अर्वाच्य भाषेत आई-बहिणीवर शिवीगाळ केली आहे. तसेच तुझे 10 लाख रुपये घेऊन जा असे सांगितल्यानं शिक्षक कुटुंब दहशतीखाली आहे.
19 वर्षे सेवा दिलेले शिक्षक या संस्था चालकाच्या धमकीने घाबरुन गेले आहेत. मला न्याय द्या, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात मुजोर संस्था चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे शिक्षकाचं म्हणणं…
मी प्रामाणिकपणे महर्षी कणाद महाविद्यालयात सहशिक्षक म्हणून 2002 पासून काम करत आहे. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी सांगितलेले काम इमाने इतबारे करतो. मात्र मुख्याध्यापकांनी सांगितलेलं काम करण्यास मला थोडा उशीर झाला होता. त्यात त्यांचे पती आणि संस्थाचालक यांनी मला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. जातीवाचक शिवीगाळ करून शाळेत आला तर तुकडे तुकडे करून टाकतो व घरी येऊन जाळून टाकतो अशी धमकी दिली आहे.
‘मी शाळेतील चार जणांचा खून करणार आहे. त्यात तुझा पहिला नंबर आहे’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकाला अशा पद्धतीने वागणूक देणं चुकीचं आहे. याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपी केशव भांगे या मुजोर संस्था चालकाला अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी दिला आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी संस्था चालक केशव भांगे विरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…