ताज्याघडामोडी

पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी):- भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन पंढरपूर शहरामधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ऑनलाईन चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पंढरीतील विठ्ठल इन येथे नुकताच संपन्न झाला. या समारंभास नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, माजी जि. प. सदस्य व्यंकटआण्णा भालके, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, युवा नेते रोहन परीचारक, माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, कार्यक्रमाचे आयोजक श्रीनिवास उपळकर, युवक नेते युवराज पाटील, विनोद लटके, स्पर्धेचे परीक्षक उमेश सासवडकर, किरण मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. सतत मोबाईल, टीव्ही., कॉम्युटर वगैरेसमोर बसुन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. आजच्या घडीला त्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीला आणि हाताला काहीतरी वेगळे करण्याचा आनंद भेटला, दररोजच्या त्याच त्या रुटीनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे कार्य यामुळे झाले. असे प्रतिपादन यावेळी बोलताना पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बशीर शेख यांनी तर सुत्रसंचालन विशाल आर्वे यांनी केले. उपस्थितांचे आभार उमेश वायचळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोर काकडे, सोपान (काका) देशमुख, समाधान पोळ, तानाजी गुंजाळ, गणेश भिंगारे, प्रथमेश भिंगारे, पुंडलिक अंकुशराव, सुरज कांबळे, सागर चव्हाण, सारंग दिघे तसेच श्रीनिवास उपळकर मित्रपरीवाराचे बहुसंख्य सदस्यांनी अथक परीश्रम घेतले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

17 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

17 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago