गुन्हे विश्व

राम मंदिरावरील टीकेवरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेकडून यावरुन टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात शिवसेना भवनच्या बाहेर भाजप जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले.

दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.

पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजप जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. दरम्यान भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिक शिवेसना भवनमध्ये जमले होते.

भाजपचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवले, असता बाचाबाची झाल्याची माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेना भवनवर कोणी चाल करणार असेल तर प्रतिकार करणार हेच शिवसैनिकांना माहिती असून त्यांनी तेच केल्याचे त्यांनी म्हटले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago