पुणे, 16 जून: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येते संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
मराठा क्रांती मूक आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांची उद्या 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.
कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण दिलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राज्य समन्वयक उपस्थित असणार आहेत. राज्य समन्वयक करणं गायकर, राजेंद्र कोंढरे, रगुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, रमेश केरे आदी समन्वय बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सुपर न्यूमरी, वसतिगृह, ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती, कोपर्डी पीडितेला न्याय या राज्यसरकार कडील मागण्यांवर उद्याच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…