सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे.
या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या 4 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे याने तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई कशी केली?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रादाराच्या तक्रारीनुसार करगणी ग्रामपंचायतीजवळ सापळा रचला. त्यानंतर सरपंच खंदारे याला तक्रारदारांकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अखेर याप्रकरणी संरपंचाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…