मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा’ असे सांगत एका तरुणाने दारणा नदीच्या पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात येऊन वाचवण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि. १४) दुपारी तीनच्या सुमारास विकास विनायक लाखे (१९) रा. भोर मळा, सिन्नरफाटा नाशिकरोड याने चेहेडी येथील दारणा नदीच्या नवीन पुलावरून पूर्व दिशाने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्याला वाचवण्याचा कसोशिने प्रयत्न केला.उडी मारण्यासाठी त्याने पुलाच्या कठड्याला धरुन उडी मारत असताना ‘माझी शूटिंग काढा’ असे नदीत असलेल्या लोकांना ओरडून सांगत हात सोडून नदीतील पाण्याच्या डबक्यात उडी मारली.
हा प्रकार पाहणार्या नागरिकांनी धावत जाऊन त्याला बाहेर काढले. पळसेचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यावर बिट मार्शल रवींद्र खोंडे, नितीन पाचोरे, विनायक भरसट आदी स्थानिकांच्या मदतीने संंबंधित व्यक्तीस बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…