सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती भंडीशेगाव एक समृद्ध गाव विविध समाज उपयोगी कार्यक्रमासंदर्भात चर्चासत्र आज मंगळवार दिनांक १५ जून रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर आ. सुभाष देशमुख यांनी मार्गर्शन केले. संस्थेचे सल्लागार उद्योजक अजित कंडरे यलमार यांनी सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून भंडीशेगावचे पालकत्व घेतले असून लवकरच आणखी काही विधायक उपक्रमांचे आयोजन या ठिकाणी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी संस्थेच्या संचालक मयुरी वाघमारे, मोहनअनपट त्याचबरोबर संस्थेचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य पल्लवी यलमार,सरपंच मनिषाताई , उपसरपंच विजय पाटील कदम , कृषी सहाय्यक यादव मॅडम.माजी सरपंच संजय रणखांबे ,गंगाराम विभुते दौलतराव ननवरे ,मधुकर गिड्डे ,हनुमंत आंपळकर, संतोष ननवरे ,मंगेश ननवरे, चंद्रशेखर कोळवले, ज्ञानेश्वर गिड्डे, हसीना शेख, इसाक शेख, सौ छाया गिड्डे ,विद्या ननवरे, जंगबहादुर गिड्डे, पोलीस विठ्ठल विभुते, डॉक्टर. श्रीधर यलमार, सतीश रणखांबे, डॉक्टर.अनिल कंडरे, भीमराव ननवरे, राहुल ताकतोडे, सोमनाथ विभुते, बाबुराव यलमार गुरुजी, मुख्याध्यापक. विश्वजीत माने, आनंदा शेगावकर, विजय ननवरे, प्रदीप यलमार पाटील,अनिल यलमार उपस्थित होते.
याप्रसंगी भारत सरकारच्या संख्याशास्त्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या संख्याशास्त्र परीक्षेत भंडीशेगाव येथील प्रशांत विजय ननवरे व भंडीशेगाव येथे ग्रामपंचायत क्लार्क पदावर सेवा दिलेले बंटू अंपळकर यांचा सन्मान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी गावातील माजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व सोलापूर सोशल फाउंडेशन चे पंढरपूर तालुका समन्वयक लखन वाघमारे उपस्थित होते.