ओबीसी आरक्षण प्रश्नी आ.गोपीचंद पडळकर यांची पंढरपूर वडार समाजसमवेत बैठक
ओबीसी आरक्षण,रॉयल्टी मुक्त गौण खनिज,आर्थिक विकास महामंडळ आदींबाबत चर्चा
ओबीसी आरक्षण प्रश्नी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात घेतलेल्या वडार समाज बांधवाच्या बैठकीत राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रश्नी आपली भूमिका मांडली व वंचीत घटकांना सत्तेत सहभागी होण्यासाठी हे आरक्षण कसे गरजेचे आहे हे पटवून दिले.यावेळी उपस्थित वडार समाजातील नेत्यांनी वडार समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांची माहिती आमदार पडळकर याना दिली.वडार समाज हा कष्टकरी समाज आहे,या समाजाला पारंपरिक व्यवसायासाठी दगड,वाळू,मुरूम याची दोनशे ब्रास उपलब्धता रॉयल्टी मुक्त करण्यात यावी.महावीर नगर परिसरात वडार समाजाच्या समाज मंदिराची अनेक वर्षाची मागणी आहे ती पूर्ण व्हावी,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजासाठी वार्षिक शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती,त्यासाठी तरतूद व्हावी,वडार समाज बांधवाना वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून घरकुले मिळावीत अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी निवेदनाद्वारे केली.या बैठकीत बोलताना वडार समाजाच्या सर्व प्रशांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
यावेळी वडार समाजातील माजी नगरसेवक साहेब चौगुले,अंबादास धोत्रे, दयाघन महाराज ,माजी नगरसेवक मोहन पवार, अण्णासाहेब काळे, गफूर धोत्रे,दत्ता भोसले,पिंटू बाबा पवार, राजू धोत्रे, दत्तात्रय भोसले ,शंकर चौगुले ,महादेव धोत्रे,अर्जुन पवार, रवी चौगुले,भारत चौगुले,प्रकाश चौगुले,अण्णा जाधव,नवनाथ पवार,पिराजी धोत्रे,शुभम इटकर,दत्तात्रय धोत्रे,किशोर चौगुले,दत्ता शिंदे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी आभार मानले.