बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मंजुषा विधाते असे त्यांचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले होते. संबंधित प्रकरण मंजुषा यांच्याकडे होते. त्यासंदर्भात त्यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडे 50 हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती.त्याची पडताळणी करून एसीबीने केलेल्या कारवाईत मंजुषा यांना रंगेहात पकडण्यात आले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…