ताज्याघडामोडी

दुर्दैवी ! शाळेवर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चार शिक्षकांची कार पडली खड्ड्यात, पाण्यामध्ये चौघांचाही गुदमरून मृत्यू

हिंगोली – दिशादर्शक फलक नसल्याने भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघात चार शिक्षकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. जिल्ह्यातील सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गावरील भानखेडा या गावाजवळ हा अपघात झाला आहे.

अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. लोणार तालुक्यातील पळसखेडा येथील हे शिक्षक आहेत. हे चारही शिक्षक शाळेवर रुजू होण्यासाठी जात असताना कार खड्ड्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

सेनगाव ते येलदरी व सेनगाव ते रिसोड या महामार्गाच्या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक न ठेवल्याने हा अपघात घ़डला आहे.

सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाही. त्यामुळे ही कार खड्ड्यात जाऊन पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन त्यातच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला.

खड्डयामध्ये वाहनाचा लाईट दिसत असल्याने काही गावकऱ्यांनी ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

याघटनेची माहिती मिळताच सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार अनिल भारती, शिदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago