ताज्याघडामोडी

शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय.

सुधारित परिपत्रकामुळे शाळा कधी सुरु करायच्या याची स्पष्टता झाली आलीय.या परिपत्रकानुसार 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश सरकारने शाळांना दिलेत. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, “शाळा प्राशासन अद्याप मार्गदर्शक सुचनांच्या प्रतिक्षेत”शाळा नेमक्या कधी सुरू करायचा, याबाबत संभ्रम होता. पण आता त्याची स्पष्टता झाली. शाळा 15 जूनपासून सुरू होतील. परंतु शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या आहेत, याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.”

“दरवर्षी या परिपत्रकात प्रथम सत्र, द्वितीय सत्र, दिवाळी सुटीचा कालावधी असा तपशीलवार उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शाळांना वर्षभरातील सुट्ट्यांचे, परिक्षांचे आणि इतर कामकाजाचे नियोजन करता येत नाही”, असं मत हरिश्चंद्र गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

20 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

20 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago