गुन्हे विश्व

खळबळजनक ! भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एका महाविद्यालयीन तरुणीने व्हिडीओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूरमधून समोर आली आहे. या व्हिडीओतून तरुणीने जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही, असे म्हणत आत्महत्या केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतच मोबाईलमध्ये आणखी काही आहे का?

सोनू शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत सोनू ही लातूरमधील एका महाविद्यालयात बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षण घेतानाच ती पार्टटाईम जॉबही करत होती. आता हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. आयुष्याच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकणार नाही. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी अधून- मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी. कारण मी गेल्यानंतर तीचे जगण खूप मुश्किल होणार आहे, असे तिने व्हिडीओत म्हटले आहे.

सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होत. त्यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होते. त्यातूनच सोनूने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते. लातूर पोलीस तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago