उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या एका माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीमुळे निषेध व्यक्त केला जात आहे.
कळंब शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाणीची घटना घडली
शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने डॉक्टरांना मारहाण केल्याचे कृत्य घडले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या माजी खासदाराच्या पुतण्याचे नाव बालाजी नरहिरे असून, डॉ. अभिजित लोंढे यांच्यावर हल्ला करणाऱ्या बालाजी नरहिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गाड्या पार्क करण्याच्या मुद्यावरूनच लोंढे आणि बालाजी नरहिरे यांच्यात वाद झाला होता
अभिजित लोंढे यांचे हॉस्पिटल कळंब शहरातच असून त्यांच्या हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे घर आहे. कळंब शहरातील लसीकरण केंद्र हे डॉ. लोंढे हॉस्पिटलमध्ये असून, सध्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेले नागरिक हॉस्पिटल समोरच आपल्या गाड्या पार्क करत असतात. त्यामुळे गाड्या पार्क करण्याच्या कारणावरून डॉक्टर लोंढे आणि बालाजी नरहिरे यांच्यात वाद झाला होता. या वादातून बालाजी नरहिरे यांनी डॉक्टर अभिजीत लोंढे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत डॉक्टर अभिजीत लोंढे त्यांच्या मानेला जखम झाली आहे.
लोंढे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे घटनेचा निषेध म्हणून शहरातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय
अभिजीत लोंढे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे घटनेचा निषेध म्हणून शहरातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हा हल्ला माजी खासदार व त्यांचे पती रमेश नरहिरे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप डॉक्टर अभिजीत लोंढे यांनी केला आहे. डॉक्टर अभिजित लोंढे यांना मारहाण झाल्यावर लसीकरण केंद्रही बंद करण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बालाजी नरहिरेला ताब्यात घेतले आहे. पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कामकाज सुरू करणार नसल्याचा डॉक्टरांनी इशारा दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…