रेशनचा ४०० पोती तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणारा ट्रक मोहोळ पोलिसांनी पकडला

सावळेश्वर तालुका मोहोळ येथे मोहोळ पोलिसांनी पकडलेला तो ४०० पोती तांदूळ रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले असून या बाबत मोहोळ पोलिसांनी कसून तपास करीत कनिश्ठ वैधानिक अधिकारी / अन्न विष्लेशक जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सोलापुर यांचेकडे पाठपुरावा करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील दोघांसह एकूण ५ इसमांविरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम-3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       या बाबत मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.दिनांक 29/05/2021 रोजी 00.30 वाजण्याच्या सुमारास सदर क्रमांकाची ट्रक येताना असता तो थांबविण्यात आला. गाडीत असलेल्या दोघांना खाली उतरवुन त्यांना त्यांचे नाव गाव व गाडीमध्ये असलेल्या मालाबाबत चैकषी केली असता त्यांनी त्याचे नाव 1)हरिदास नारायण माळी 2) महेष हणमंत फडतरे दोघे रा. तुगंत ता. पंढरपुर असे असल्याचे सांगितले. गाडीमध्ये 400 कटटे तांदुळ असुन ते सुपे जिल्हा अहमदनगर येथील गजानन अँग्रो सेल्स यांचेकडे घेवुन जात असल्याचे सांगितले गेले.माल हा स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ असल्याचे संषय आल्याने आम्ही षहानिषा करण्याकरीता सदर वाहन व वरिल दोन इसमांना ताब्यात घेवुन मोहोळ पोलीस स्टेषन येथे नेण्यात आले होते.दिनांक 07/06/2021 रोजी सदर ट्रकमधील तांदळाचे सम्पल दोन पंचासमक्ष पुरवठा अधिकारी गायकवाड यांचे उपस्थितीत घेण्यात आले आहे. त्याप्रमाणे सविस्तर वेगळा पंचनामा करण्यात आला आहे.तहसिल कार्यालय मोहोळ यांचे जावक क्रमांक – पुरवठा / कावि /281/2021 दिनांक 09/06/2021 अन्वये पत्र देवुन कळविले की, पुरवठा /कावि /270/ 2021 दिनांक 02/06/2021 अन्वये कनिश्ठ वैधानिक अधिकारी / अन्न विष्लेशक जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगषाळा सोलापुर यांना सदरचा तांदुळ हा षासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा कसे तसेच मानवास खाण्यायोग्य आहे का निकृश्ट दर्जाचा आहे. सदरबाबत तांदळाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविले असता त्यांनी त्यांचेकडील पत्र क्रं .No DPH/SUR/GF-1/618/2021 Dated-08/06/2021 अन्वये Report on sample of food -Rice दिलेला आहे. असे अहवाल प्राप्त झाला आहे. एकंदरीत दिनांक – 29/05/2021 रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या एम एच 12 ई एफ 1374 या ट्रकमधील 400 कटटे तांदळाबाबत यातील चालक हरिदास नारायण माळी व मालक तांदळाचे मालक सादीक जावीद कलबुर्गी यांचे जबाबावरून सदर ट्रकमधील तांदुळ हे षासकीय वितरण प्रणालीतील असल्याचे आमचे खात्री झाली आहे.
       1).सादीक जावेद कलबुर्गी रा. षेळगी रोड सोलापुर,2). वसीम नसरूददीन षेख रा. जोडभावी पेठ सोलापुर, 3). अझहर महमंद कलबुर्गी रा. जोडभावी पेठ सोलापुर यांनी संगनमत करून लोकाकडुन षासकीय वितरण प्राणालीतील तांदुळ कमी किंमतीने घेवुन बाहेर काळया बाजारात विकुन पैसे कमविण्याच्या उददेषाने ट्रक क्र एम एच 12 ई एफ 1374 चे 4). ट्रक चालक हरिदास नारायण माळी रा. तुगंत ता.पंढरपुर 5). ट्रक क्लिनर – महेष हणुमंत फडतरे रा. तुगंत ता. पढरपुर यांना हाताषी धरून त्यांचे मार्फतीने 400 कटटे षासकीय वितरण प्रणालीतील तांदुळ सुपे जि अहमदनगर येथे घेवुन जात असताना ट्रक क्रं एम एच 12 ई एफ 1374 चे किंमत अंदाजे दहा लाख रू. व चारषे कटटे तांदुळ किंमत 4,29,568/- रूपयाचे असे एकुण 14,29,568 रूपयाचे मुददेमालासह ताब्यात घेण्यात आला असून अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम-3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago