ताज्याघडामोडी

लसीकरणातील अंतर वाढवणे धोकादायक, अँथनी फाउची यांचा इशारा

लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोव्हिडच्या विषाणूंची बाधा होण्याची शक्यता वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी दिला आहे. एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. त्यावर फाउची बोलत होते. ते म्हणाले, ‘मॉडर्नाच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन डोसमधील अंतर तीन आठवडे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविले तर तुम्ही करोनाच्या विषाणूला बळी पडण्याची शक्यता वाढते. ब्रिटनमध्ये हेच घडले. त्यांनी दोन डोसमधील अंतर वाढविले आणि तेथे त्या काळात करोनाच्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्ही दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस करतो.’ लशीचा पुरवठा अल्प असल्याने दोन डोसमधील अंतर वाढविले असावे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यावरून १२ ते १६ आठवडे केले होते. कोव्हिशील्डच्या लशींमधील हे अंतर तीन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढविण्यात आले होते. मार्च महिन्यांत राज्यांना लशीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे लशीची परिणामकारकता वाढत असल्याचे सांगण्यात आले. सरकार जास्तीत जास्त लोकांना लशीचा पहिला डोस देण्यासाठी आणि लशीचा तुटवडा असल्याने हे बदल करीत असल्याचे दिसून येत होते. हा माफक दृष्टिकोन असल्याचे फाउची म्हणाले. करोना विषाणूच्या पुढे राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: डेल्टा व्हेरियंटसाठी ते आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

डेल्टा विषाणू अधिक जोरकसपणे पसरतो आणि त्यामुळे हा विषाणू असलेल्या कोणत्याही देशाने चिंता करावी. त्याचा मुकाबला करण्यासाठी मोठी तयारी आणि लसीकरण करावे, असेही फाउची म्हणाले.

दरम्यान,काल वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने लस घेतलेल्या लोकांनाही पुन्हा करोनाची लागण होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यावरही फाउची यांनी मत व्यक्त केले असून, ते म्हणाले, की जरी करोनाची लागण होऊन गेली असली तरी लस घेणे आवश्यक आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago