लग्नासाठी मुलीच्या वडिलांनी स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने मुलाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी येथील हॉटेल रॉयल येथे घडली.गणेश विक्रम खराडे (वय 32), उमेश विक्रम खराडे (वय 34, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय 51, रा. चोंढी, ता. जामखेड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लता पंजाब खराडे (वय 47, रा. काळाखडक, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी लता यांचा मुलगा आणि आरोपी तुकाराम उदमले यांची मुलगी यांचा विवाह करण्याचे नियोजित होते. मात्र, तुकाराम यांनी त्यांची मुलगी लता यांच्या मुलाला देऊ नये म्हणून आरोपी गणेश आणि उमेश या दोघांनी लता यांचा मुलगा व्यसनी आहे.
त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही. तो फालतू आहे, असे सांगून तुकाराम यांची दिशाभूल केली. त्यामुळे तुकाराम यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. फिर्यादी लता यांना फक्त आशेवर ठेवले.
याच कारणावरून लता यांच्या मुलाने 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रॉयल हॉटेल येथे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवला. त्यामध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…