जालना, 12 जून: मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं काही वर्षांपूर्वी पुण्यातील वडगाव शेरी येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाशी लग्न झालं होतं. काही दिवस आनंदात गेल्यानंतर पतीच्या दारुच्या व्यसनामुळे तिचं आपल्या पतीसोबत खटके उडू लागले.
त्यामुळे तिने आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगीही झाली होती. पीडित महिला आपल्या मुलीसोबत एकटी पुण्यात राहात होती.
दरम्यान भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असणाऱ्या गोपाळ प्रकाश शिरसाट याने संबंधित महिलेला बळजबरी गावी आणलं. याठिकाणी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत पीडितेचं अमोल शिरसाट नावाच्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावू दिलं. या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर हे प्रकरण पारध पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पारध पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही. या घटनेची चौकशी केली जात असून लवकरच आरोपींना गजाआड केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…