भंडीशेगावचा प्रशांत ननवरे संख्याशास्र स्पर्धेत भारतात दुसरा
भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे.
प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे.ह्या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे. ह्या स्पर्धेसाठी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डाॕ.आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव ,नवोदय विद्यालय पोखरापूर , फर्ग्युसन काॕलेज व पुणे विद्यापिठ येथे झाले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…