पुणे – सराईत वाहनचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील मुख्य आरोपी पाव विक्रीचा व्यवसाय करतो. त्याआडून तो वाहनांची रेकी करुन त्या चोरायचा.
फैज अरिफ अन्सारी (22, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. ‘तीन व्यक्ती चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असून ते शेवाळवाडी पेट्रोल पंपाकडूनन मांजरीकडे येणार आहेत,’ अशी माहिती पोलीस अंमलदार अकबर शेख व प्रशांत दुधाळ यांना मिळाली होती.
त्याप्रमाणे शेवाळवाडी रस्त्यावर पोलीस थांबले असता, युनिकॉर्न मोटार सायकलवर तिघे सोलापूर रस्त्याने मांजरीकडे वेगात योना पोलिसांना दिसले.त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, ते पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन थोड्या अंतरावर तिघांना पकडले.
पळण्याचे कारण विचारले असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी ते नसल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्यांनी ही मोटरसायकल साडेसतरानळी येथून चोरल्याची कबुली दिली. यातील फैज ऊर्फ बेनटेन हा हडपसर परिसरामध्ये पाव विकतो. आरोपींकडून 10 गुन्हे उघड झाले असून, 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचे इतर दोन साथीदार हे फरार आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…