गुजरातमधील वडोदरा येथे 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने ‘तुझसे नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूं मैं’ गाणं म्हणत एक व्हिडीओ बनवला होता. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वडोदरा येथील सनफार्म रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे आई-वडिल मजूरी करतात. घटनेच्या दिवशी देखील ते कामासाठी बाहेर गेले होते. कामावरून घरी परतल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह लटकत्या अवस्थेत आढळला. मृत मुलगा ज्वेलर्सच्या दुकानात काम करत असे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मृत मुलाचा मोबाईल तपासला असता आत्महत्येपूर्वी त्याने गाणं म्हणल्याचा एक व्हिडीओ तयार केला होता. मृताचा मोबाईल आणि इतर साहित्य तपासासाठी पाठवले असून त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…