एका मद्यपी मुलाने आजारी वडिलांची करोना टेस्ट केल्यावर त्यांचा ब्लेडने गळा चिरुन खून केला. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली. मद्यपी मुलाने घरातील सदस्यांना दोन दिवस बेडरुममध्ये कोंडून ठेवत बाहेर खबर न देण्याची धमकी दिली होती. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच खूनी मुलाला पोलिसांनी बेड्या घातल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोणी काळभोर येथे मेकॅनिकचे काम करणाऱ्या व्यक्तीचे वडिल मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्याने त्यांची सात जूनला करोना चाचणी केली. यानंतर आठ तारखेला ‘मै तुम्हे बिमारीसे आझाद कर दुंगा’ असे म्हणत पहिला गळा दाबला.
यानंतर गळ्यावर ब्लेडने सपासप वार करुन खून केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह तब्बल दोन दिवस घरातच ठेवला होता. घरातील बहिण व दोन भाच्यांना त्याने बेडरुममध्ये डांबून ठेवले. त्यांना कोणालाही याची खबर न देण्याची तंबी दिली होती.
दरम्यान, त्याच्या पासून विभक्त रहात असलेली पत्नी आज घरी आली होती. तीने ही घटना पाहिल्यावर तीला धक्का बसला. तीने तातडीने पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर मद्यपी मुलाला ताब्यात घेतले. यासंदर्भात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. यासंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…