ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज -ना.रामदास आठवले

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांच्यात मतैक्य झाले. आज सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ना रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी शरद पावर यांनी मराठा अरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी 

एक्त्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या साठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत ; आपणही केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. 

 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा याबाबत ना रामदास आठवले यांनी खा.शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. शरद पवार यांच्याशी झलेल्या भेटीत ना. रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago