ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुग्णालयात 1 हजार 400 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

पंढरपूर, दि. 09:-  पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात  कोरोना बाधित रुग्णांची संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण्‍ मोठ्या प्रमाणात दाखल  झाले होते.पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात  तालुक्यातील तसेच परिसरातील 1 हजार 400 हून अधिक  गरीब व गरजू रुग्णांना आतापर्यत उपचार करण्यात आले असल्याची माहिती  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली होती. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयात 50 बेडचे कोविड हॉस्पिटलची क्षमता असतानाही 100 ते 150  कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. अपुरे मनुष्यबळ असताना देखील कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले.  तसेच ऑक्सिजनची बचत करण्यासाठी ‘नॉन रिब्रीदींग मास्क’चा प्रयोग प्रथमच करण्यात आला त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळण्याबरोबर ऑक्सिजनची बचतही मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी यावेळी दिली.

उपजिल्हा रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या उपचारा बरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवर  देखील उपचार करण्यात येत आहेत. तसेच आतापर्यत 7 हजार 990 जणांची कोविड आरटीपीसीआर चाचणी व 16 हजारहुन अधिक संशियत व्यक्तींची रॅपिड ॲटिजेन चाचणी करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आहोरात्र उपचार केल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले

जिल्हाशल्यचिकित्सिक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago