कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीतून विनामास्क ७ जणांनी प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईला विरोध करून पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात घडली. रितेश माणिक जगधने (वय 28, रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात नाकाबंदीत वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी मोटारीतून रितेश सात जणांसह विनामास्क प्रवास करीत होता.
त्यामुळे कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक पावती करण्याचे धोत्रे यांनी त्यांना सांगितले. त्याचा राग आल्यामुळे रितेशने पावती पुस्तक हिसकावून घेत, तुला काय करायचे ते कर, अशी एकेरी भाषा वापरून शासकीय कामात अडथळा आणला. ‘संघटनेचे कार्यकर्ते बोलावून तुला हिसका दाखवितो, रास्ता रोको करतो, धंद्याला लावतो’ अशी धमकीही रितेशने दिली होती. त्याने धोत्रे आणि शिपाई कुलथे यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…