ताज्याघडामोडी

पूर रेषेतील गावांनी दक्षता बाळगावी          तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या सूचना

पूर रेषेतील गावांनी दक्षता बाळगावी

तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या सूचना

     पंढरपूर, दि. 08:-  गेल्या वर्षी  अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे  तालुक्यातील नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच जिवित व पशुहानी टाळण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन  यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच भीमा नदी काठच्या पूररेषेतील गावांनीही दक्षता घ्यावी अशा सूचना तहसिलदार सुशिल  बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या.

 नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती बैठक सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. याबैठकीस गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, तालुका कृषी अधिकारी  राजेंद्र पवार, सहाय्यक उपनिबंधक एस.एम.तांदळे, उपमुख्याधिकारी  सुनिल वाळुजकर,  भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले यांच्यासह संबधित विभागाचे 

तालुक्यातील नदी काठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहचणार नाही तसेच जिवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करण्यात आले आहे.तसेच  महापुरामुळे नदी काठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित झाली आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच तालुका प्रशासनाकडून संबधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली.

उजनी धरनातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत संबधित विभागाने समन्वय ठेवून  नियोजन करावे.  नदी पात्रातील अतिक्रमणे  केलेल्या नागरिकांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत व सुरक्षित ठिकाणी जावे. नदी, नाले, ओढे या वरील असलेल्या पुलांची व संरक्षण कठवडयांची  पाहणी बांधकाम विभागाने करावी. पावसाळ्यात साथीचे रोग अधिक उध्दभवण्याची शक्यता असते यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवावा अशा, सूचनाही श्री. बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

19 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

19 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago