पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत दर्शन युवराज हळंदे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्कानुसार करण्यात आलेली ही 27वी कारवाई आहे.
त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दर्शन युवराज हळंदे (वय 21, रा. अपर बिबवेवाडी ) आणि रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज -कोढवा रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने सराईत दर्शन हळंदे याने टोळी तयार केली होती. त्यानुसार बिबवेवाडी परिसरात दहशत पसवित दंगा, मारामारी, खूनाचा प्रयत्न टोळीकडून करण्यात आला होता.
त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. हळंदे टोळीने 15 मे रोजी आकाश बाजीराव खोपडे याच्यावर तलवार उगारली होती. त्याशिवाय मॉन्टी कालेकर तरूणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. हळंदे टोळी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत गुन्हे करीत होती.
त्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हळंदे टोळीविरूद्ध मोकानुसार कारवाई केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, एपीआय किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे, चंद्रकांत माने, स्मित चव्हाण, दैवत शेडगे यांच्या पथकाने केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…