भडगाव येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथे काल (सोमवार) शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांचे कृषीपंप वीज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी भडगाव उपविभागातील शहर, ग्रामीण भागातील उपकेंद्राना टाळे ठोक आंदोलन केले. हे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर दुपारी चाळीसगाव रोड लगत असलेल्या महावितरण कार्यालयात सात अज्ञातांनी प्रवेश केला.
कार्यालयात असलेले उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (वय ४३, रा. पाचोरा) यांना जबर मारहाण सुरू केली. धामोरे यांना दमदाटीही केली.घटनास्थळी असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे हे धामोरे यांना सोडविण्यास गेले. यावेळी हल्लेखाेरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली.गजानन राणे खाली पडून मृत झाले. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखाेरांनी कार्यालयातील कॉप्युटर, युपीएस तसेच टेबलावरील व केबिनच्या काचा फोडल्या. सुमारे ५० ते ६० हजार रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले.
वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे यांच्या मृत्यूस अज्ञात सात जण कारणीभूत आहेत. उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ७ जणांविराोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षकांची भेट…
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला यावेळी मारहाण करणाऱ्यांना थांबवायला गेलेल्या वायरमनचा मृत्यू. या घटनेची माहिती वार्यासारखी शहरात पसरली. महावितरणचे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात धाव घेत अजय धामोरे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगाव भाग उप विभागीय पोलिस आधिकारी कैलास गावडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपास पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…