इंदापूर शहराच्या लगत पुणे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी इर्टिगा कार आणि बोलेरो जीप यांचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.सोमवारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला असून, (एम एच 13 झेड 3901) महिंद्रा बोलेरो जीप, व मारुती इर्टिगा (क्रमांक एम एच 46 बीई 4515,) यांचा भीषण अपघात झाला आहे. मारुती इर्टिगा मध्ये एकच प्रवासी होता, तर महिंद्रा बोलेरो मध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर व्यवहारे पेट्रोल पंपा शेजारी इर्टिगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने एकमेकांना धडकली. टायर फुटल्यामुळे अपघात घडला.
सदर अपघाताची माहिती इंदापूर पोलिसांना कळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इर्टिगा गाडीचा चालक ज्योतीराम सूर्यभान पवार (वय 30 वर्ष, जिल्हा रायगड), अविनाश कुंडलिक पवार (वय 32 वर्ष), गणेश पोपट गोडसे (वय 34 वर्ष), बाळासाहेब चांगदेव साळुंके (वय 30 वर्ष) (तिघेही रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. या घटनेचा तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…