शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा यासह विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन

टाळेबंदी नंतर नव्याने सर्व काही सुरू होत असताना. नागरिकांची घरपट्टी माफ करणे , फि माफी, आठवडे बाजार सुरू करणे,  साखर कारखान्याची बिल अदा करणे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या मागण्या पुर्ण न झाल्यास लवकरच आंदोलनाचा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला.

मनसेच्या वतीने आज विविध पदाधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची भेट घेऊन सुमारे आठ ते नऊ मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करणे , साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची साखर बिले त्वरित अदा करणे अन्यथा कारखान्यांवर गुन्हे दाखल करणे , कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयाचा खर्च शासनाने अदा करणे ,  विद्यार्थ्यांना शिक्षण माफी करणे आणि नवीन वर्गात प्रवेश देणे ,  पंढरपूर – सोलापूर तिर्‍हे मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू करणे , 65 एकर परिसरातील रुग्णालयात मोफत उपचार करा , सर्व आठवडे बाजार सुरू करणे , उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधा निर्माण करणे . अशा मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच मनसेच्या वतीने काही उपाय योजना देखील यावेळी शासनाकडे तहसीलदार यांच्यामार्फत सुचवण्यात आले आहेत. प्रसंगी तहसीलदारांनी मनसेचे निवेदन स्वीकारून याबाबत शासनाकडे सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करण्याचे आश्वस्त केले असल्याचे धोत्रे यांनी सांगितले.

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,शाखा अध्यक्ष स्वप्नील जाधव, तेजस गांजाळे,सहकार सेने चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौगुले, शुभम काकडे, नागेश इंगोले, विनोद बागल,अभिमान डुबल इत्यादी उपस्थित होते. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago